राष्ट्रीय आदिवासी नाटय महोत्सव चंद्रपूरात.. रसिकांना तीन दिवस निशुल्क नाटकांची मेजवानी- 19 ते 21 सप्टेंबर 2025…

298

संपादक प्रशांत बिट्टूरवार
चंद्रपूर:
बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी च्या निमित्ताने
चंद्रपूर शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी नाट्य महोत्सवाचे आयोजन होत असून, दिनांक 19, 20 व 21 सप्टेंबर 2025 रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात हा महोत्सव सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. मराठा चारिटेबल ट्रस्ट, लोकजागृती नाट्य संस्था व स्वर्गीय माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन चंद्रपूर-वनी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्ह्याचे खासदार डॉ. नामदेव किरसान राहणार आहेत. या प्रसंगी माननीय प्राध्यापक वसंत पुरके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जमाती काँग्रेस तथा माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य राम चव्हाण, प्रा. डॉ. इसादास भडके, डॉ. अनिल हिरेखन (कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ), डॉ. दिलीप चौधरी (सिनेट सदस्य), अश्विनी खोब्रागडे अध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ विचार मंच . कॉम्रेड नामदेव कन्नाके, प्रमोद बोरीकर, प्राचार्य के. आत्माराम, आदिवासी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष गुंजन येरणे,आदिवासी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पवन मसराम ज्येष्ठ लेखक चुडाराम बल्हारपुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन प्रयोग :
महोत्सवाचा पहिला दिवस 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता लोकजागृती नाट्य संस्था, चंद्रपूर प्रस्तुत व दिग्दर्शक डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी सादर केलेल्या “धरती आबा बिरसा मुंडा” या भव्य नाट्यप्रयोगाने होणार आहे. या नाटकात 35 ते 40 कलाकारांचा सहभाग आहे.
दुसरा दिवस :
20 सप्टेंबर रोजी सायं. 6 वाजता “गोंडवानाचा महायोद्धा वीर बाबुराव शेडमाके” या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. या नाटकाचे लेखन चुडाराम बल्हारपुरे यांनी केले असून दिग्दर्शन डॉ. अनिरुद्ध वनकर यांचे आहे.