नशेचा डाव उधळला! चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…

58

प्रतिनिधी गौरव मोहबे
चंद्रपूर – उडता चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेने गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठी कारवाई करीत तब्बल २९८ ग्राम ब्राऊन शुगर / हेरॉईन जप्त करीत २ आरोपीसह तब्बल ३० लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष बाब म्हणजे अनंतचतुर्दशी ला पोलीस यंत्रणा हि विसर्जनाच्या कामात व्यस्त असते आणि त्यादिवशी नशेचा व्यापार करणाऱ्या आरोपींनी ब्राऊन शुगर आणण्याचा डाव साधला मात्र स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचा डाव हाणून पाडला.
चंद्रपुरात पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली
६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरात गणेश विसर्जनाचा भव्य मिरवणुकीचा सोहळा सुरु होता, अश्यातच मोठ्या प्रमाणात शहरात मादक पदार्थ येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने नागपूर-चंद्रपूर रोडवरील पडोली चौकात सापळा रचला. काही वेळात चारचाकी वाहन क्रमांक MH३४ BR ७७६५ ला पोलीस पथकाने थांबवित वाहनांची झडती घेतली, सदर वाहनात पोलिसांना २९८ ग्राम ब्राऊन शुगर/हेरॉईन आढळली.
नशेच्या तस्करीत पोलिसांनी आणलं विघ्न, मोठी कारवाई
आढळलेल्या ब्राऊन शुगरची आरोपी अवैधरित्या विक्री करणार होते, सदर मादक पदार्थ हे मुंबई वरून आणला असल्याची माहिती आहे. गणेश विसर्जन सोहळ्यात पोलीस आपलं कर्तव्य बजावीत असताना आरोपी ४२ वर्षीय नितीन उर्फ छोटू शंकर गोवर्धन राहणार महात्मा फुले वॉर्ड बाबुपेठ व २३ वर्षीय साहिल सतीश लांबदूरवार राहणार भिवापूर वॉर्ड यांचा हा पोलिसांनी हाणून पाडला हे विशेष. आरोपींने मादक पदार्थ ज्या व्यक्तीकडून आणले त्यावर सुद्धा कारवाई होणार असून सदर प्रकरणी आरोपींची संख्या वाढणार याबाबत पुढील तपास सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली. Ganesh festival drug operation bust 298 grams brown sugar
मादक पदार्थाची तस्करी करण्याकरिता वापरलेले वाहन, ब्राऊन शुगर, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ३० लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. आरोपीवर गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे. brown sugar heroin trafficking busted in Chandrapur