प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट:
चामोर्शी:
घोट-रेगडी मार्गावर वाढता अपघाताचा धोका’ लक्षात घेऊन अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. त्याची दखल घेऊन काल पासून घोट – रेगडी मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे
चामोर्शी तालुक्यातील रेगडी हे गाव घोट येथून १५ किमी अंतरावर आहे. रेगडी या गावात जिल्ह्यातील सर्वात मोठा व एकमेव कन्नमवार जलाशय असल्यामुळे या स्थळावर नेहमीच वर्दळ असते. तर सर्वसामान्यांना नेहमीच घोट व तालुका मुख्यालयात ये-जा करावी लागते. मात्र, या रस्त्यावर हजारो खड्डे पडले असल्याने वाहनधारक, सर्वसामान्यांनी या मार्गावरून कसे जावे ? हा चिंतनाचा विषय ठरला होता सध्या पावसाळा सुरू असल्याने रेगडी येथील जलाशयाला विदर्भातील अनेक पर्यटक हजेरी देत असतात. अशात रेगडी-घोट मार्गाची दैनावस्था झाली असून, या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने मार्गावरील वाट अधिकच बिकट बनली होती त्या मार्गे चारचाकी वाहन आल्यास खड्यामुळे या वाहनाचे टप्पर मोडल्याशिवाय राहणार नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. घोट-रेगडी या मार्गावरील निकतवाडा ते नवेगाव दरम्यान खूप मोठ-मोठे खड्डे पडले होते घोट-रेगडी हा मार्ग पूर्णतः खड्डेमय झाला असल्याने वाहनधारकांना मनःस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने घेत तत्काळ रस्त्याचे नुतनीकरण करावे अशी मागणी विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. प्रसंगी आंदोलन करण्याचा ईशाराही दिला होता. यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.
बॉक्स:गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणी
चामोर्शी तालुक्यातील रेगडी हे गाव घोट येथून काही किमी अंतरावर आहे. या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गाची दुरास्था झाल्याने अनेकदा अपघात झाले आहेत मागणीची दखल घेत आता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी पावले उचलली आहेत. मात्र या रस्त्याची थातुर मातूर दुरूस्ती न करता गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणी तालुका संघर्ष समितीचे तथा विदर्भ आंदोलन समितीचे अशोक पोरेडीवार यांच्या सह अनेकांनी केली आहे.