वोट चोरी विरोधात गोंडपिपरी काँग्रेसचे स्वाक्षरी अभियांन…

77

प्रतिनिधी शरद कुकुडकर

गोंडपिपरी:

देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील घोळ आणि बोगस मतदार याचा पर्दाफाश करणारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाचा तथा भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणला. देशात लाखो मतदार हे बोगसरीत्या आणून मतांची चोरी करून हे सरकार सत्तेवर आणले गेले यात निवडणूक आयोग याचा देखील समावेश आहे जर हे खरे नसेल तर निवडणूक आयोगाने याचे उत्तर द्यावे असा प्रश्न देखील राहुल गांधी यांनी केला.मात्र निवडणूक आयोगाकडून अजूनही अपेक्षित असे कोणतेच उत्तर आलेले नाही. केवळ उडवा उडवीची ते भाषा करीत आहेत, म्हणूनच या वोट चोरीच्या विरोधात देशभर काँग्रेस पक्षातर्फे स्वाक्षरी अभियान राबवून जनजागृती करण्यात येत आहे.

याच धरतीवर गोडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे गांधी चौक येथे दिनांक ३१ ऑगस्ट दुपारी बारा वाजता स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, राजीवसिंह चंदेल, माजी तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष अशोक रेचनकर, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे ,शहराध्यक्ष राजू झाडे, गौतम झाडे, विपिन पेदुलवार, साई कोडापे, अजय माडुरवार, रफिक शेख यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली.आणि “वोट चोर..खुर्ची छोड” असे नारे देण्यात आले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बोगस मतदार भाजपने आणून त्या मतावर निवडणूक जिंकली. घुगुस या शहरात ११९ बोगस मतदार उघडकीस आले.गोंडपिपरी या ठिकाणी देखील निवडणुकी दरम्यान बोगस मतदाराचा प्रयोग करण्यात आला.हे सरकार मत चोरून सत्तेत आलेले सरकार असून काँग्रेसचे सरकार आल्यास त्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही असे मत शहर अध्यक्ष राजू झाडे यांनी व्यक्त केले.यावेळी बालाजी चणकापुरे, शंभू येलेकर,प्रशांत कोसनकर, धीरेंद्र नागापुरे,सारनाथ बक्षी, धीरेंद्र नागापुरे, अनिल कोरडे,अभय शेंडे,रमेश हुलके, महेंद्र कुनघाटकर, रेखा रामटेके, संतोष बंडावार, मनोज नागपुरे,सोनी दिवसे, आशिष निमगडे यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.