सिनिअर सिटीझन कार्ड: ज्येष्ठ नागरिकांसाठी नवसंजीवनि…

141

मुख्य संपादक प्रशांत शाहा

सिनिअर सिटीझन कार्ड म्हणजेच ज्येष्ठ नागरिक कार्ड हे भारत सरकारने ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना दिलेले अधिकृत दस्तऐवज आहे. हे कार्ड ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखीचा पुरावा असुन, त्याद्वारे त्यांना अनेक प्रकारच्या फायदे आणि सुविधा मिळू शकतात.

*`ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी पात्रता`*

▪️अर्जदार हा भारताचा नागरिक असावा लागतो.

▪️अर्जदाराकडे वैध ओळख पुरावा असावा लागतो.

▪️अर्जदार ज्या राज्यातून कार्डासाठी अर्ज करत आहे, त्या राज्याचा तो कायमचा रहिवासी असावा लागतो.

*`ज्येष्ठ नागरिक कार्डासाठी आवश्यक कागदपत्रे`*

*वयाचा पुरावा:* जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला इ.

*ओळख पुरावा:* आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इ.

*पत्ता पुरावा:* आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल इ.

*फोटो:* अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो.

*`ज्येष्ठ नागरिक कार्डचे फायदे`*

▪️ *प्रवास सवलत*

– रेल्वे प्रवासावर ४०-५०% पर्यंत सूट

– हवाई प्रवासावर ५०% पर्यंत सूट (काही एअरलाईन्सवर)

– बस प्रवासावर ५०% पर्यंत सूट (राज्य परिवहन बसमध्ये)

– रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांवर स्वतंत्र रांगेची सुविधा

▪️ *आर्थिक लाभ*

– बँक ठेवींवर जास्त व्याजदर

– आयकर सवलत आणि कपात

– पोस्ट ऑफिस योजनांमध्ये जास्त व्याजदर

– पेन्शन योजनांमध्ये विशेष लाभ

▪️ *आरोग्य सुविधा*

– सरकारी रुग्णालयात मोफत किंवा अनुदानित उपचार

– काही खाजगी रुग्णालयांमध्ये सूट

– आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर सवलत

– औषधांवर सवलत