विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके यांचा इशारा…

141

सहसंपादक श्याम मशाखेत्री:

चंद्रपूर:

महात्मा जोतिबा फुले व प्रशिक्षण संस्थेकडून स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण आणि मासिक विद्यावेतन पण दिले जात होते.मात्र यावर्षीपासून ऑनलाईन प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यावेतन बंद करण्यात आले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.विद्यावेतन बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.या विद्या वेतनातून त्यांचा राहण्याचा खर्च भागत होता.विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बराच खर्च येतो आहे.यासाठी महाज्योतीच्या साहाय्याने बराच आधार मिळत होता.आता मात्र प्रशिक्षण बंद केल्यामुळे विद्यावेतन मिळणार नाही.या नवीन निर्णयामुळे गरीब विद्यार्थि नाराज झाले आहे.विद्यावेतन बंद झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शहरात राहणे अशक्य झाले आहे.परिणामी त्यांना स्वगावी परतावे लागत आहे.त्यांच्या शिक्षणात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्राध्यापक. अनिल डहाके यांनी दिला आहे.