प्रतिनिधी श्याम मशाखेत्री
चंद्रपूर… गणपती विसर्जनाच्या दिवशी उभारण्यात येणाऱ्या स्वागत मंडपावरून भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार गट आणि आमदार किशोर जोरगेवार गटातील वादाचा भडका होऊ नये म्हणून यासाठी पालिकेने दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देवून मंडपात 100 मिटर अंतर ठेवावे असे निर्देश दिले आहे.मुनगंटीवार गटाचे माजी महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांना लोकमान्य टिळक विद्यालयाच्या उजव्या बाजूला तर जोरगेवार गटाला डाव्या बाजूला स्वागत मंडपासाठी महानगरपालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले.मुनगंटीवार गटाने लोकमान्य विद्यालयाच्या उजव्या बाजूला परवानगी मागितली होती तर चार दिवसांनी जोरगेवार गटांनी त्याच ठिकाणी मंडप उभारणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र मागितले होते.यानंतर मुनगंटीवार व जोरगेवार गट समोरासमोर आले.परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना घटनास्थळ गाठावे लागले.शेवटी महापालिका आयुक्त यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटात 100 मिटर चे अंतर ठेवण्याचे निर्देश दिले..







