सह संपादक शाम मशाखेत्री
चंद्रपूर:
पवित्र ईद-ए-मिलाद या उत्सवाच्या औचित्याने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांनी सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचा सुंदर संदेश दिला. आंबेडकर चौक, राजुरा येथील राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्वागत मंडपातून त्यांनी सर्व मुस्लीम बांधवांचे आत्मीय स्वागत केले. बंधुता, शांतता आणि प्रेम यांचे प्रतीक असणाऱ्या या सणानिमित्त धोटे यांनी उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
“ईद-ए-मिलाद हा सण बंधुभाव, परस्पर आदर आणि मानवतेचे धडे देणारा आहे. विविधतेत एकता हा आपल्या देशाचा आत्मा असून अशा सणांमधून सामाजिक ऐक्य अधिक दृढ होते,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सय्यद सकावत अली, राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक साईनाथ बतकमवार, रामनंदेश्वर गिरडकर, काँग्रेसचे जिल्हा महासचिव एजाज अहमद, भुषण बानकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, फारूक शेख, सय्यद साबिर, शाहनवाज कुरेशी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.