जनतेच्या जीवाशी खेळणारा सुरजागड–गट्टा रस्ता!…

336

जनतेच्या जीवाशी खेळणारा सुरजागड–गट्टा रस्ता!…

प्रतिनिधी प्रीतम गग्गुरी अहेरी:

आज पुन्हा एकदा अडेंगे–नेडर गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला फसली. प्रवासी घाबरून गेले, मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला. हा प्रकार नवीन नाही—सुरजागड–गट्टा रस्ता म्हणजे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.

सुरजागडच्या डोंगरातून लाखो टन लोहखनिज काढण्यासाठी सरकार, आमदार, खासदार, पालकमंत्री, सहपालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना वेळ मिळतो, पण स्थानिक जनतेच्या जीवाचा प्रश्न त्यांच्या दृष्टीने काहीच नाही.

कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव भाकपा तथा राज्य उपाध्यक्ष AIYF म्हणाले
“आमचा जीव धोक्यात, आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला जात नाही, पण आमच्या जमिनीतील लोहखनिज मात्र सरकारला हवंच आहे. हा *जनतेच्या श्रम आणि जीवनावर केलेला खुला अन्याय* आहे. जनतेच्या जीवावर चालणारा हा विकास आम्ही सहन करणार नाही.”

गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. जनतेच्या संघर्षाशिवाय या रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

रस्ता द्या, विकास द्या – अन्यथा 15 सप्टेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर भाकपा तर्फे धरणे आंदोलन उभारले जाईल!