चेतनसिंह गौर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचे उपक्रम : नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व ज्येष्ठांचा गौरव…

218

शरद कुकुडकार  गोंडपिपपरी तालुका प्रतिनिधी

गोंडपिपरी:- मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेतून गौर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत यावर्षी समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे.

दिनांक ४ सप्टेंबर रोजी कन्याका सभागृह गोंडपिपरी येथे दुपारी 12 वाजता भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर, गरजूंसाठी मोफत चष्मे वाटप, तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतून अनेकांना पुन्हा प्रकाशमान जग पाहण्याची नवी संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानाला कृतज्ञतेची सलामी देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय तज्ज्ञांची टीम कार्यरत राहणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चेतन सिंह गौर मित्रपरिवार यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आकर्षण दमदार नेतृत्व *आमदार देवराव दादा भोंगळे* तसेच *साधा माणूस विलास झटे* यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला नवी उर्जा आणि प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींना छेद देत, समाजोपयोगी कामाच्या माध्यमातून आनंद वाटण्याचा गौर यांचा हा उपक्रम गावकऱ्यांच्या मनाला भावला आहे. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत “गौर यांच्या वाढदिवसामुळे अनेकांच्या जीवनात नवा प्रकाश उजळनार असल्याच्या ” भावना व्यक्त केल्या आहेत.