मुख्य संपादक प्रशांत शाहा
इंडिया दस्तक न्यूज टीव्ही
वृत्त:-
सुरक्षा दलांच्या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. जंगल तसेच परिसरातील गावांमध्ये नक्षलवाद्यांना आश्रय घेणे कठीण झाले आहे. पुढील काळात नक्षलवाद्यांचा सुकडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. आपला अंत आता निकट येऊ लागला आहे, असे नक्षलवाद्यांना वाटू लागल्याने निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. संतापलेल्या नक्षलवाद्यांनी भ्याड कृत्य केल्याची घटना छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. काल मंगळवारच्या रात्री सुकमा जिल्ह्याच्या केरळपाल पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिरसेट्टी पंचायतीच्या नंदापारा गावातील दोन ग्रामस्थांना झोपेतून उठवत घरातून उचलून दूरवर जंगल परिसरात नेले व तुम्ही मोबाईलवरून पोलिसांना माहिती देता, असे म्हणून दोघांचाही धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. देवेंद्र पदमी आणि पोज्जा पदमी असे हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यातच पोलिसांचे खाबरी असल्याच्या संशयावरून दोन
गावकऱ्यांनाही मारहाण केली. दोघांच्याही पायांना आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती होताच घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे पत्रक आढळून आले. त्यात त्यांनी लिहिले की, १० एप्रिल रोजी त्याने पोलिसांना माहिती देऊन आमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. तो २०२२ मध्ये खबऱ्या म्हणून काम करत आहे. यासोबतच त्याच्यासारख्या खबऱ्यांना आणि लोकविरोधी काम करणाऱ्यांना अशी मृत्युदंडाची शिक्षा मिळेल, असे लिहिले आहे. नक्षलवाद्यांच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.







