प्रतिनिधी श्याम मश्याखेत्री:
संपूर्ण महाराष्ट्रात साधा माणूस या नावानी प्रसिद्धी मिळवणारा विलास झट्टे यांचे “साधा माणूस आपला विल्या र…” हे शीर्षक असलेले नवीन गीत विलासच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे ज्याचे गीतकार, संगीतकार, गायक महेश बेंडे आणि संगीत संयोजक शुभम चांदोरे ( Dark Night Studio ) वर्धा हे आहे आणि दिग्दर्शन विदर्भाचे फेमस यूट्यूबरं रवी वानखडे यांनी केले आहे आणि नृत्यदिग्दर्शक म्हणून जतिन राऊत यांनी आपली भूमिका बजावली आहे आणि चित्रीकरण इरफान शेख यांनी केले, ज्यात मध्ये प्रमुख भूमिकेत विलास झट्टे उर्फ साधा माणूस स्वतः आहे आणि सोबतच रवी वानखडे, विक्की खडसे, आदी निरगुळे, तन्मय सरोदे, आकाश महाडुळे, नितीन मुंजेकर, अमोल खडसे, संदीप डोंगे, कुणाल मुत्यलवार, गौरव दोडके, करण गेडाम, जतिन राऊत, कार्तिक नेहारे, संकेत जक्कूलवार, राणी तेलंग, भारती तेलंग, अनु धुमने, कोमल किन्हेकर, जोशना बदखल, शुभांगी निकोडे, वैष्णवी कुक्केवर, श्रुतिका डोंगे, अविनाश आरपलीवर, मंजुषा कोणप्रतीवर, स्वाती लिहितकर, रौनक बदखल यांनी पण आपली भूमिका चोख निभावली आहे या गाण्याचे चित्रीकरण वणी तालुक्यातील साखरा ( दरा ) या गावात झाले असून ज्यामध्ये गावकऱ्यांनी पण आपला सहभाग दर्शवला आणि सोबत मारेगाव इथे पण खूप काही चित्रीकरण झाले आहे आणि या गाण्याची प्रस्तुती Vilas Zatte ( Namune Production ) या यूट्यूब चॅनेलवर होणार असून प्रदर्शन कार्यक्रम वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालय इथे येत्या 19 ऑगस्ट होत आहे