पुन्हा एकदा आलापल्लीत सुरजागड लोहप्रकल्पातील ट्रक चा धुमाकूळ..रात्री १० च्या नंतर चालतात ५०० हून अधिक ट्रक पुन्हा किती नागरिकांचा घेणार जीव..या सर्व बाबींकडे दुर्लक्ष कोणाचा?

289

अहेरी :- आलापल्ली हे गाव गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना आलापल्ली शहरांत कामासाठी व वस्तू खरेदी -विक्री साठी यावे लागते. आलापल्ली मुख्य चौकातुन भरधाव ट्रकाची सुरुवात म्हणजे “मौत का खेल* जिव धोक्यात घेऊन आलापल्ली यावे लागते. शाळकरी मुलांना सुद्धा मुख्य चौकाशीवाय पर्याय नाही.

अशीच काही वर्षांपूर्वी परिस्थिती होती. आलापल्ली चौकातुन भरधाव ट्रका चालु झाले. आणि आलापल्ली शहरात दुर्घटनाचे प्रमाण वाढले. काही निष्पाप लोकांची या ट्रक खाली आपला जिव गमवावे लागले. सुरजागड ट्रकामुळे खुप परिवार पोरके झाले. ही प्रकरणे वाढू लागली. यांची गंभीरता लक्षात घेत सुरजागड ट्रका आलापल्ली मुख्य चौकातुन बंद व्हावे व कंपनी चा विरोधात आलापल्ली शहरांतील व्यापारी तसेच नागरिकांनी कंपनी विरोधात बंद पुकारला आणि त्याचा प्रयत्नाला यश आले. कंपनी चा ट्रकाला आलापल्ली शहराचा बाहेरून पर्याय मार्ग दिले आणि आलापल्ली मुख्य चौकातुन भरधाव ट्रका बंद झाले.

आणि आता परत तीच परिस्थिती निर्माण झाली ट्रकासाठी शहराचा बाहेरून पर्याय मार्ग असतांनाही भरधाव ट्रकाचे आलापल्ली मुख्य चौकातुन सुरूवात झाली आहे. अपघाताचे प्रमाण वाढेल, आणि लोकप्रतिनिधी या सर्व प्रकरणात दुर्लक्ष करीत आहेत . सामान्य लोक जाणार तरी कोणाकडे .