मेल नर्सेस ग्रुपच्या पहिल्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न…

735

चंद्रपूर , 20 सप्टेंबर: मेल नर्सेस युथ क्लब आणि सामान्य रुग्णालय चंद्रपूरच्या वतीने आज पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 85 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी एक नवा आदर्श निर्माण केला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना झाडांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्त्ती जीवने, R.M.O. डॉ. बंडूजी रामटेके, अधीसेविका श्रीमती मांडवकर, श्रीमती माया आत्राम आणि सर्व महिला नर्सेस यांची उपस्थिती होती. यावेळी विशेष सहकार्य शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, चंद्रपूर यांचे लाभले.

या उपक्रमामुळे रक्तदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यात यश मिळाल्याचे आयोजकांचे मत आहे.