नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांचे निधन

1042

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. माहितीनुसार, यकृताची समस्या असल्याने त्यांच्यावर नागपुरातील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता.

डॉ. चौधरी यकृताशी संबंधित आजारावर मागील काही महिन्यांपासून उपचार घेत होते. त्यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांना नागपुरातील  किंग्सवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मागील आठवड्यात रात्री प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबई येथे नेण्याचा निर्णय निकटवर्तीयांनी घेतला होता. त्यानुसार, ‘एअर अ‍ॅम्बुलन्स इंडिया’ या कंपनीशी संपर्क साधून एअर अ‍ॅम्ब्युलन्सची नोंदणी करण्यात आली. त्यासाठी सात लाख रुपयांचा भरणाही कंपनीकडे करण्यात आला. मात्र वेळेत एअर अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांच्यावर नागपूरातील खाजगी रुग्णालयातच उपचार सुरू होता,मात्र यात डॉक्टरांना यश न मिळाल्याने अखेर गुरुवारी त्यांचे निधन झाले.

निलंबनाची कारवाई सुरू होती

डॉ. चौधरी यांना २१ फेब्रुवारी २०२४ ला कुलपतींनी निलंबित केले होते. मात्र, निलंबन करताना अपेक्षित कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने डॉ. चौधरींचे निलंबन रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी ११ एप्रिलला पुन्हा पदभार स्वीकारला. परंतु, यानंतर लगेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्या समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर कुलपतींनी चौधरी यांना ४ जुलै ला कुलपतींनी दुसऱ्यांदा निलंबित केले होते. यासंदर्भात कारवाई सुरू होती.

दिनेश मंडपे
कार्यकारी संपादक
इंडिया दस्तक न्यूज टिव्ही