Home Breaking News एस आर एम काॅलेज ऑफ सोशल वर्क येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न 

एस आर एम काॅलेज ऑफ सोशल वर्क येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न 

380

सर्वोदय शिक्षण मंडळ व्दारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार काॅलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूर येथे प्रभारी प्राचार्य डॉ जयश्री कापसे यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली तसेच प्रा.नितिन रामटेके, तात्पुरता प्रभार, यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मधील प्रथम कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योग करून निरोगी दिर्घायुष्य जगण्याचा संकल्प केला. याप्रसंगी प्रा. नितीन रामटेके, योग प्रशिक्षक मा.श्री. बाळा लांबट तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा समन्वयक प्रा. संतोष आडे यांनी उपस्थितांना आतंरराष्ट्रीय योग दिवसाचे व मानवी जीवनातील योगाचे महत्त्व स्पष्ट करीत आयुष्यात निरोगी जिवन किती महत्त्वाचे आहे ते सांगितले. सोबतच आज संपूर्ण देशातच नाही तर जगातीक स्तरावर मानवी जिवनात योगा व प्राणायामाचे महत्त्व पटवुन देण्यात भारत देश यशस्वी झाला ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

 याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष आडे व सहाय्यक ग्रंथपाल बाळा लाबंट यांनी योग प्रात्यक्षिके सादर करीत सर्व उपस्थितांकडुन ती करवून घेतले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आजच्या योग दिनाचा आनंद योग प्राणायाम करून घेतला.

Don`t copy text!