Home चंद्रपूर ‘गटविकास अधिकारी, यांना ग्रामसेवक संघटनेचे निवेदन

‘गटविकास अधिकारी, यांना ग्रामसेवक संघटनेचे निवेदन

596

बळीराम काळे, जिवती

जिवती (ता.प्र.) : जिवती तालुक्यातील एकूण ३६ ग्राम पंचायती असून यात ग्रामपंचायतीमध्ये मागील तीन वर्षांपासून अनेक ग्रामसेवक ,ग्रामसेविका कार्यरत आहेत.त्यापैकी बहुसंख्य ग्रामसेवकांची काही वयक्तिक आणि सामूहिक पातळीवरील कामे बरीच प्रलंबित आहेत.त्यापैकी बहुसंख्य समस्या या आर्थिक बाबिशी निगडित असून,काही समस्या या सेवा सुरक्षिततेच्या हिताच्या आहेत.त्यामुळे संबंधीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन,जीवतीच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती जिवती यांना विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष मुन्ना सिडाम,उपाध्यक्ष विनोद शेरकी,सचिव सचिन उईके,कार्याध्यक्ष विवेक तीतरे, व महिला उपाध्यक्षा अर्चना भोयर,जयप्रकाश मोहूर्ले,मोहन जोगी,रवी बोरकर,अन्य ग्रामसेवक उपस्थित होते.मूळ समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष घालून आमच्या समस्यांचे निराकरण करावे असे,संघटनेच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून कळविण्यात आले.तसेच मुळ सेवापुस्तक अद्ययावत करून द्यावे.आणि मुळ सेवापुस्तकाची दुय्यम प्रत प्रमाणित करावी.अशीही मागणी आहे.

Don`t copy text!