Homeचंद्रपूरथेरगाव येथील सरपंचाचा भाजपाला रामराम ठोकीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश भाजपात मोठी खिंडार,तालुक्यातील...

थेरगाव येथील सरपंचाचा भाजपाला रामराम ठोकीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश भाजपात मोठी खिंडार,तालुक्यातील अनेक भाजपाचे सरपंच व पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर

सावली :- राज्याचे विरोधी पक्षनेते सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सक्षम व भक्कम नेतृत्वावर विश्वास ठेवीत थेरगाव थेरगाव येथील सरपंच मा.सुधीर शेरकी यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकित काँग्रेस पक्षात आपल्या कार्यकर्तासह पक्षप्रवेश केला,मागील कित्येक महिन्यापासून ते सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने व पदाधिकारी यांच्या संपर्कात होते, भाजपच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत काल राज्याचे विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार हे सावली तालुका दौरावर असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत थेरगाव येथील सरपंच मा.सुधीर शेरकी आणी त्यांचा सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.*

*सुधिर शेरकी हे पक्षप्रवेश करतावेळी माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर तथा उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे सभापती मा.हिवराज पाटील शेरकी,चिचबोडी येथिल सरपंच मा.सतीश नंदगीरवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार तसेच आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी सावली तालुक्यातील अनेक भाजपाचे सरपंच व पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती विरोधी पक्षनेते व सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांना दिली.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी असे झाल्यास भाजपात मोठी खिंडार पडून काँग्रेस पक्षाला याचा मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.*

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!