Homeअहेरीअहेरीत “महाराष्ट्र ओडेवार समाज प्रबोधन मेळावा” संपन्न

अहेरीत “महाराष्ट्र ओडेवार समाज प्रबोधन मेळावा” संपन्न

प्रितम म.गग्गुरी(उपसंपादक)

अहेरी: महाराष्ट्र ओडेवार समाज तर्फे ओडेवार समाज प्रबोधन मेळावा समाजातील उद्भवणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक समस्या निवारणासाठी शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०२४ ला दुपारी १२.०० वाजता अहेरी येथील इंडियन पॅलेस सभागृहात हजारो बांधवाच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

मेळाव्याची सुरुवात चिंचगुंडी या गावातून सर्वप्रथम रॅली काढून करण्यात आली. यामध्ये वाल्मिकी यांची प्रतिमा लावून “जय ओडेवार जय जय ओडेवार” या घोषवाक्याच्या जयघोषाने रॅली चिंचगुंडी ते अहेरी येथील इंडियन पॅलेस पर्यंत ही रॅली काढण्यात आली. प्रभातफेरीची सांगता करून मुख्य समाज प्रबोधन मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात गंगा मातेच्या प्रतिमेला पुष्प आणि मार्लापण करून करण्यात आले.

या समाज प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन सुधाकरराव टेकुल, (वि.अ.सी.) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रामन्नाजी बदीवार, माजी त. मु. अ. रामपूर, कार्यक्रमाला उपाध्यक्ष म्हणून शंकरराव राजन्नाजी पानेम (म.ओ.स.से.), प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून ॲड.व्येंकटेश पानमवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोषजी बद्दीवार आणि सीता काडबाजीवर यांनी केले.
मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले श्री.ॲड .वेंकटेश पानमवार मलकापूर, बुलढाणा, यांनी या ओडेवार समाज प्रबोधन मेळावा मध्ये आपल्या समाजाच्या विकासासाठी संघटन व एकजूट असले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.तसेच समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न केला पाहिजे असे समाजाच्या हिताचे उद्बोधन केले.पुढे बोलताना त्यांनी समाजाच्या एकजूटीसाठी समाज प्रबोधन मेळाव्याचे महत्व स्पष्ट केले. उद्घाटक श्री.सुधाकर टेकुल सर यांनी शिक्षण हा समाजसुधारणेच्या पाया आहे, म्हणून शिक्षणाकडे प्रत्येक पाल्याने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे म्हटले.
या कार्यक्रमाला उपस्थित श्री.शंकर पानेमवार, ग्रामसेवक, श्री.तोटा मल्लिकार्जुनराव, राष्ट्र नायक तेलंगणा, चित्तूर गांधीगार,गारे आनंद,बोडेंकी चंदू, तोटा नागेश्वरराव, डाॅ.प्रविन बोडंकी ,नागेश बद्दी,सतीश पानेम,यांनी मार्गदर्शन केले.आणि प्रमुख पाहुणे म्हणून ओडेवार समाजातील प्रत्येक गावातील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!