Homeचंद्रपूरछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत योगेश वासनिक प्रथम...ज्ञानवेध...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत योगेश वासनिक प्रथम…ज्ञानवेध फाउंडेशन नांदगाव (घोसरी) यांचे आयोजन..

प्रशांत झाडे(तालुका प्रतिनिधी)

नांदगाव (घोसरी ):- ज्ञानवेध फाउंडेशन नांदगाव (घोसरी )द्वारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर दिनांक 11/ 2/ 2024 रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली. या परीक्षेमध्ये खुला गट लहान गट अशा दोन गटातून परीक्षा घेण्यात आल्या खुला गट प्रथम क्रमांक 7000/- द्वितीय क्रमांक 5000 /-तृतीय क्रमांक 3000 /- शील्ड व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये एकूण 265 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.

त्यामध्ये खुला गट 100 पैकी 89 मार्क घेऊन योगेश शरद वासनिक यांनी प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक गौरव मल्लाजी अलीवार, तृतीय क्रमांक गोकुळ शामराव मोहुर्ले, तर लहान मुलांच्या गटातून 100 पैकी 89 मार्क घेऊन भूषण रामदास पाल यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय क्रमांक कार्तिक संजय मंडरे, राजू शिंदे, तृतीय क्रमांक अक्षय किरण भंडारे यांनी पटकाविला.

या सामान्य ज्ञान पारितोषिकेचे वितरण दिनांक 18 /2 /2024 रोजी डॉक्टर अभिलाषा गावतुरे मॅडम चंद्रपूर, हिरालाल भडके, सर विषमता निर्मूलन मूल,सुरज मेश्राम वनरक्षक दिघोरी, सतीश कुसराम सर सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली,यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी ज्ञानवेध फाउंडेशनचे, स्वप्निल पगडपलीवार, राकेश अल्लीवार, अभिनव दुर्गे, अक्षय सोनुले आशिष भंडारी, मंगेश मोहरले विकी मोहरले,आशिष शिंदे, शैलाश राऊत, यांनी मोलाची भूमिका बजावली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!