Homeचंद्रपूरओबीसींच्या न्याय हक्कासाठी पोंभुर्णा  येथे ओबीसी जनजागृती कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पोंभुर्णा  येथे ओबीसी जनजागृती कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांचे नेतृत्व

पोंभुर्णा :- या मातीचा खरा योद्धा ओबीसी आहे परंतु केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने देशातील ओबीसी वर्गाची उपेक्षा होत आहे. महाराष्ट्रात कष्टकरी, शेतकरी,युवा,वर्गाची पिळवणूक होत आहे, राज्य शासनाने 26 जानेवारी रोजी जे परिपत्रक काढले त्यामध्ये ओबीसीच्या आपल्या हक्काच्या आरक्षणात मराठा समाजाला समाविष्ट करण्याचा घाट घातला आहे ते परिपत्रक रद्द करावे व ओबीसीचे आरक्षण साबूत ठेवावं यासाठी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रविभाऊ मरपल्लीवार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ओबीसी विभाग अमित डी. पाल, उपाध्यक्ष गणेश अर्जुन कर, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सोशल मीडिया प्रशांत झाडे, युवक काँग्रेस अध्यक्ष हेमंत आरेकर, अनुसूचित जाती अध्यक्ष हर्षानंद दुर्गे, अनुसूचित जमाती तालुका अध्यक्ष देवरावजी कळते, विनोद थेरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, विनायक बुरांडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा, युवा आशिष अहिरकर, राजा रामजी मोहुर्ले, दादाजी व्यहाडकर, यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक गावात जाऊन, ओबीसी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे, या ओबीसी जनजागृती मोहिमेला पोंभुर्णा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे,

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!