राजुरा: महाराष्ट्र थ्रोबाॅल संघटना व चंद्रपूर जिल्हा थ्रोबाॅल संघटनाच्या वतीने कु. स्टेला जाॅन पीटर, कु. पलक मसाडे व कु. श्रीया चौधरी यांची महाराष्ट्र संघात निवड झाली तसेच शाळेचे क्रीडा प्रमुख श्री. भास्कर फरकाडे यांची महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली ते थ्रोबाॅल असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने आयोजित 45 राष्ट्रीय थ्रोबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघात खेळणार आहे. ही स्पर्धा तितीक्षा पब्लिक स्कूल, दिल्ली येथे 8 ते 11 फेब्रुवारी ला होणार आहे. या खेळाडूंना शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख भास्कर फरकाडे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर प्रभा डि. एम, संस्थेच्या सचिव मदर कृपा मारिया, चंद्रपूर जिल्हा थ्रोबाॅल संघटनेचे सचिव डॉ. राकेश तिवारी सर, शाळेचे सर्व शिक्षक वृंध व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.