Homeचंद्रपूरपद्मापुर अंतर्गत बिटस्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा...

पद्मापुर अंतर्गत बिटस्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा…

चंद्रपूर: मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच जीवनातील खेळांचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी जिल्हा परिषद चंद्रपुर द्वारे बीट ते जिल्हा स्तरापर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात.

त्याच अनुषंगाने सन 2023-24 च्या बीट पद्मापुर अंतर्गत जि.प.उ.प्रा.शाळा सिनाळा व मसाळा जुना येथे दि.२४ जानेवारी २०२४ ला सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीमती सरिताताई नरूले सरपंच ग्रामपंचायत सिनाळा या होत्या तर उद्घाटक म्हणून मा. धनंजय साळवे गटविकास अधिकारी पं.स. चंद्रपूर हे होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा. ऋषिकेश साहेब परिविक्षाधीन उपशिक्षणाधिकारी जि.प. चंद्रपूर, हे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सिनाळा चे उपसरपंच मा. सुरज शेंडे, सिनाळा शाळा व मसाळा जुना शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. महादेव मेडपल्लीवार व श्रीमती दिपालीताई रणदिवे, मा. धनपाल फटींग साहेब विस्तार अधिकारी (शिक्षण) हे उपस्थित होते.
स्पर्धेची सुरवात बीट तथा केंद्राच्या ध्वजाचे ध्वजारोहण आणि क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आली. या नंतर विद्यार्थ्यांच्या सांघिक व वैयक्तिक क्रीडास्पर्धा आणि दुपारी 4.00 वाजता सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. आणि दोन्ही स्पर्धेनंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. ज्यात मैदानी क्रीडास्पर्धा प्राथमिक गट व सांस्कृतिक चॅम्पियन पद चोरगाव शाळेने पटकाविले तर मैदानी क्रीडास्पर्धा माध्यमिक गट आणि जनरल चॅम्पियन शिल्ड मिळविण्याचा मान सिनाळा शाळेला मिळाला. बक्षीस वितरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.नितीन भटारकर प्रामुख्याने उपस्थित होते.

पद्मापूर बिटाचे विस्तार अधिकारी (शिक्षण)मा.श्री धनपाल फटींग साहेब, मा. श्री निखिल तांबोळी केंद्रप्रमुख केंद्र – पद्मापुर आणि मा. श्री प्रकाश झाडे, केंद्रप्रमुख, केंद्र – दुर्गापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिनाळा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निती रामटेके व मसाळा जुना शाळेचे मुख्याध्यापक श्री.गावतुरे सर व सिनाळा शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी उत्तम आयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिटातील सर्व मुख्याध्यापक, विषय शिक्षक व शिक्षकांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश झाडे सरांनी केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!