Homeचंद्रपूरब्रम्हपुरीहनुमाननगर येथे विजयभाऊ जनसेवा केंद्र कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न विजयभाऊ जनसेवा...

हनुमाननगर येथे विजयभाऊ जनसेवा केंद्र कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न विजयभाऊ जनसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे होणार जलद

ब्रम्हपूरी:  शहरातील हनुमाननगर येथे उभारण्यात आलेल्या विजयभाऊ जनसेवा केंद्राचा उद्घाटन समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला आहे.

सर्वसामान्य- गोरगरीब जनतेला शासकीय कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात, नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती नसल्याने ते शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहतात, ही बाब जाणून सर्वसामान्य जनतेची कामे जलदगतीने कोणत्याही अडचणी शिवाय पुर्ण झाली पाहिजे. सोबतच त्यांना शासकीय योजनांचा लाभ सहजतेने मिळाला पाहिजे या उदात्त हेतूने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतुन ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात विजयभाऊ जनसेवा केंद्र उभारून त्याठिकाणी विजयदुतांची नियुक्ती केली आहे. हे विजयदूत स्वयंसेवक नागरिकांना शासकीय व इतर कामांसाठी मदत करणार आहेत. विजयभाऊ जनसेवा केंद्रापर्यंत जे वृद्ध, अपंग व आजारी व्यक्ती पोहचू शकत नाही अशा व्यक्तींच्या घरी स्वतः जाऊन विजयदुत सेवा देणार आहेत.

विजयभाऊ जनसेवा केंद्राचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्राचार्य डॉ देविदास जगनाडे हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.राजेश कांबळे, चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामु तिवारी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, सेवादलाचे तालूकाध्यक्ष जाकीर शेख, विजयभाऊ जनसेवा केंद्राचे तालुका समन्वयक प्रा.डी.के.मेश्राम, विजयदुत प्रा. चंद्रशेखर गणवीर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, माजी सरपंच राजेश पारधी, कुरेशी काकाजी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी तर आभार विजयदूत प्रा. चंद्रशेखर गणवीर यांनी मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!