चंद्रपूर: महावितरण कंपनीने चंद्रपूर शहरातील वीज ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मिटर लावण्याचा निर्णय घेण्यात आल्या बाबत.दिनांक.14 डिसेंबर रोजी महानगर पालिका समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष श्री राहुल भाऊ देवतळे यांच्या नेतृत्त्वात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सहभागी असलेले माजी नगरसेवक दीपक भाऊ जयस्वाल,विनोद लभाने,राजेंद्र आखरे,बिंदू भाऊ बडकेलवार,जनार्दन गायकवाड,संजू भाऊ जिझिलवार,सुधाकर गर्गेलवार,सुहास पिंगे,सुनील कोहपरे,विजय बोरकुटे, अभय राऊत,राज सिलसिला,किरण तामगडागे,गौरव गोरे,सुमित ठाकरे,सौरभ मामिडवार,आशिष खडसे,नयन डोईफोडे,कृष्णा कोहपरे हे उपस्थित होते.वारंवार निवेदन देवून ही महावितरण कंपनीने बळजबरीने स्मार्ट मिटर लावण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला…