समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी दिली प्यार फाऊंडेशन ला भेट जखमी प्राणी, पक्ष्यांना उपचार करण्याविषयी जाणून घेतले कार्य

228

चंद्रपूर – स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील एम.एस.डब्ल्यू व्दितीय वर्षाच्या वैद्यकिय व मन: चिकित्सक समाजकार्य विशेषीकरणाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी संस्थेला एक्सप्लोझर भेट दिली.

प्यार फाऊंडेशन च्या माध्यमातून जखमी पाळीव प्राणी, पक्ष्यांवर उपचार केले जाते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र रापेल्ली यांना लहानपणापासून प्राण्यांविषयी आवड असल्याने जखमी प्राण्यांसाठी काहीतरी कार्य केले पाहिजे याची आवश्यकता वाटली. विदेशात शीक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरी लागली. परंतु त्यात मन रमले नाही. प्राण्यांची सेवा करता आली पाहिजे यासाठी प्यार फाऊंडेशन ची सुरुवात केली. संस्थेच्या माध्यमातून आज अनेक जखमी पाळीव प्राण्यांवर उपचार व त्यांचे पुनर्वसन केल्या जात आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र रापेल्ली यांनी संस्थेविषयी माहिती दिली. समाजकार्य विद्यार्थ्यांनी हे कार्य एक्सप्लोझर संस्था भेटीच्या माध्यमातून समजुन घेतले. व या भेटीत विद्यार्थ्यानी एका जखमी कोंबळीला जीवनदान दिले.

संस्था भेट समन्वयक प्रा. डॉ. जयश्री कापसे, प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात समाजकार्य विद्यार्थी एक्सप्लोझर संस्था भेटी देत आहेत. या संस्था भेटीचे संचालन व आभार धीरज शेंडे यांने व्यक्त केले.