अवैध दारू विक्री प्रकरणात महिलांचा पुढाकार — पोलिसांची भूमिका संशयास्पद — हप्ता वसूली करीत असल्याचा नागरीकांचा आरोप

702

गोंडपिपरी: तालुक्यातील धाबा उप पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोजोली गावात मागील अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. या विरोधात पोलिसांची थातुर मातुर कार्यवाही बघता गावात अनेक दारू विक्रेते तयार झाले. यामुळे वैतागलेल्या महिला आता अवैध दारू विक्री विरोधात कंबर कसली आणि दारू पकडून देण्याचा सपाटा चालविला. याबाबत पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद असून हप्ता वसूल करीत असल्याची चर्चा आता नागरीक करू लागले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली हे छोटेसे गाव. गावात अवैध दारू विक्री सुरू आहे. या विरोधात महिलांनी अनेकदा आवाज उठविला मात्र यांचा आवाज दाबण्यात प्रशासन नेहमीच यश आले. आणि ही अवैध दारू विक्री सुरुच राहिली. मागील दोन तीन महिन्याच्या आधी गावातीलच महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या घरातून दारू जप्त केली होती. मात्र दारू विक्रेत्याने उलट आरोप करून महीलंवरच गुन्हे दाखल केले. अशा विचित्र घटना घडून देखील पोलीस प्रशासन मात्र या अवैध दारू विक्री वर नियंत्रण ठेवू शकले नाही. दारू विक्री सुरूच होती.दि.21 नोव्हेंबर रोजी पुन्हा गावातील महिलांनी पाडत ठेऊन पुन्हा एकदा अवैध दारू पकडली आणि थेट पोलिस स्टेशनला फोन केला. पोलीस दाखल झाले आणि दोन संशयीत आरोपी पल्लवी रविंद्र कोटनाके व रविंद्र कोटनाके यांच्यावर गून्हे दाखल केले. मात्र नेहमी महीला याबाबत पुढाकार घ्यावा आणि स्वतःवर गुन्हे दाखल करुन घ्यायचे का? असा सवाल आता महिलांनी उपस्थित केला आहे. याबाबत पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेऊन येथील अवैध सुरू असलेली दारू विक्री कायमची बंद करावी अशी मागणी आता गावातील महिला वर्ग करीत आहे.