या योजनेत जिल्ह्यातील फक्त जिवती तालुक्याचा समावेश, तालुक्याचा विकास आराखडा सबमिट

420

जिवती (ता.प्र.) : केंद्राच्या महत्वाकांक्षी आकांक्षीत तालुका कार्यक्रमात आंतरमंत्रालयीन समितीने २७ राज्ये व ४ केंद्रशासित प्रदेशामधील ५०० तालुक्याची निवड केली आहे.त्यापैकी या योजनेत महाराष्ट्र राज्यातील २७ तालुक्यांत चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने इतर तालुक्यांच्या तुलनेत सरासरीपेक्षा मागे असलेल्या फक्त जिवती या एकाच तालुक्याचा समावेश आहे.

राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवसीबहुल व अतिदुर्गम जिवती तालुक्याच्या निर्मितीला दोन दशके लोटूनही जिवती तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही.आजही मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. आणि विकासाच्या प्रवाहात मुख्य दृष्टीने मागे आहे.अनेक खेड्या पाड्यात व गावात मूलभूत सुविधांचा अभाव असून, तालुक्यात समस्यांचा डोंगर आ वासून उभा आहे.याची अमलबजावणी झाल्यास तालुक्याचा विकासाचा सरासरी दर नक्की वाढेल.
या योजनेत शिक्षण व महिला बालविकास,भौतिक सुविधा,कृषी व त्यांच्याशी संबंधित सर्व व आरोग्य या पाच निकषापैकी भौतिक सुविधावर १० टक्के तर उर्वरित चार निकषावर ३० तक्के भर देण्यात येणार आहे.एकूण ३९ इंडिकेटर्सची त्या-त्या विभागानुसार विभागणी करण्यात आली आहे.यात केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जवळपास सर्व योजनांचा समावेश करण्यात आला आणि याचा केंद्रस्थारावरून सचिव व निती आयोग आढावा घेणार आहे.मुळात निती आयोगाची ही योजना आहे.केंद्र सरकारकडे त्यांनी सादर केली आणि केंद्रसरकारच्या माध्यमातून तालुक्यात ही योजना राबवली जात आहे.
विकासाच्या दृष्टीने सर्व विभागांचा विकासाचा आराखडा सबमिट करण्यात आला असून,येणाऱ्या काळात
आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधानांनी ७ जानेवारी रोजी मुख्य सचिवांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान केला होता.आकांक्षित तालुका कार्यक्रमात भारतातील सर्वात अविकसित तालुक्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विद्यमान योजनांचे एकत्रीकरण करून अंमल बजावणीसह सतत निरीक्षण करून प्रशासन सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
जिल्ह्यास्तरावर पंचायत समितीच्या जीवतीचे गटविकास अधिकारी डॉ.भागवत रेजिवाड यांची नोडल अधिकारी म्हणून निवड केली आहे. गटविकास अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची निवड त्यांच्या ‘ यशदा’ या पुणे येथील प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.