Homeचंद्रपूरजिवतीतुकाराम जी पवार यांच्या जीवनावरील ' वेलू गेला गगनावरी ' चरित्रग्रंथाचे थाटात...

तुकाराम जी पवार यांच्या जीवनावरील ‘ वेलू गेला गगनावरी ‘ चरित्रग्रंथाचे थाटात प्रकाशन स्व.खेमाजी नाईक पुण्यतिथी महोत्सवात ह.भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या शुभहस्ते

जिवती: माणिकगड पहाडावरील जिवती या आदिवासीबहुल विभागात अनेक समस्या आहेत. येथे शिक्षणाची गंगा निर्माण करणे फार कठीण कार्य होते.ही गरज ओळखून सामजिक बांधीलकी जोपासणाऱ्या तुकारामजी पवारांनी सर्वांसाठी विद्येचे महाद्वार पिट्टीगुड्या सारख्या दुर्गम भागात खुले केले.आई-वडिलाच्या पुण्याईने या शिक्षणसंस्था आज बहरल्या. अनेक विद्यार्थी घडले,याचे श्रेय या कष्ट वेचणा-या तुकाराम पवारांना जाते.त्यांचा जीवनपट प्रा .डॉ राजकुमार मुसणे सरांनी ‘ वेलु गेला गगनावरी मधून उलगडला आहे.हा चरित्रग्रंथ म्हणजे एका शिक्षणमहर्षीचा उत्तुंग जीवनप्रवास आहे ” असे विवेचन प्रसिद्ध समीक्षक प्राचार्य डॉ श्याम मोहरकरांनी केले.

स्वर्गीय खेमाजी पवार नाईक यांच्या 27 या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने पिट्टीगुडा, ता.जिवती येथे आयोजित श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव दलितमित्र माननीय तुकारामजी पवार यांच्या जीवनावरील ‘वेलू गेला गगनावरी’ या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार, भंडाराचे मधुकरराव कुकडे होते. यावेळी राष्ट्रीय समाज प्रबोधनकार कीर्तन सम्राट ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर ,सती सामत दादा देवस्थान वडांगळी, जिल्हा नाशिकचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्थेचे राष्ट्रीय महासचिव मा.अशोक राठोड,गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य तथा विद्यमान मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ .परमानंद बावनकुळे ,गोंडवाना विद्यापीठ मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य कवी डॉ .धनराज खानोरकर, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री जाधव, मा.दलित मित्र पुरस्कार प्राप्त शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे मा.तुकारामजी पवार त्यांच्या सहचरिणी सौ.सुनिताताई पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँगेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश सचिव डॉ. पंकज पवार, लेखक प्रा.डॉ.राजकुमार मुसने,स्वप्नील पवार , अरूणजी काकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून माननीय तुकारामजी पवार यांनी माझ्यावरील पुस्तक प्रकाशन हा माझ्यासाठी खरंतर सुखद धक्का देणारा प्रसंग असून मी न डगमगता संकटांवर मात करीत प्रामाणिकपणे काम करीत गेलो त्या कामाची दखल घेतल्याचे समाधान व्यक्त केले.प्रा. विश्वनाथ राठोड यांनी मनोगतातून तुकारामजी पवार यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. सती सामत दादा देवस्थान वडांगळी जिल्हा नाशिकचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी आजही 51 सदस्यांचे एकत्र कुटुंब असणारे आणि वडिलांविषयी प्रचंड निष्ठा असणारे गावासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या पवार परिवारांचा गौरव करीत तुकारामजी पवार यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर यांनी ग्रंथातील चरित्र नायक तुकारामजी पवार यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून माजी खासदार माननीय मधुकरराव कुकडे यांनी तुकारामजी पवार यांचे स्वभाव गुण आणि कार्य स्पष्ट केले. जीवती ,कोरपणा, राजुरा तालुक्यातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका आयोजक तुकारामजी पवारांनी मांडली.सूत्रसंचालन डॉ राजकुमार मुसणे यानी तर उपस्थितांचे आभार निमंत्रक डॉ.पंकजभाऊ पवार यांनी मानले.यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृती देशमुख इंदोरीकर महाराजांचे जाहिर प्रबोधनपर कीर्तन झाले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!