Homeचंद्रपूरराष्ट्रीय खेळाडू कुणाल दातारकर यांच्या नेतृत्वात ज्ञानदा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान

राष्ट्रीय खेळाडू कुणाल दातारकर यांच्या नेतृत्वात ज्ञानदा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान

वरोरा: महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 1 ऑक्टोबर 2023 ला संपूर्ण देशभर स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात आली. याच मोहिमेचा भाग म्हणून आनंदवन येथील ज्ञानदा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विद्यार्थी प्रमुख कुणाल दातारकर याच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण आनंदवन चौक स्वच्छ करून सर्व विद्यार्थी स्वच्छता ही सेवा ही मोहीम यशस्वी केली. सर्व विद्यार्थ्यानी ज्ञानदा वसतिगृह ते आनंदवन चौक तसेच तेथील बस स्टँड याची स्वच्छता केली. आणि संपूर्ण नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. स्वच्छता ही फक्त एक दिवस करायची नसते तर ती रोज करायची असते. स्वच्छता ही काळाची गरज आहे . स्वच्छता राहणार तर आपले आयुष्य निरोगी राहणार. असे मार्गदर्शन वसतिगृहाच्या निरीक्षकानीं विद्यार्थ्यांना केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!