Homeचंद्रपूरगोंडपिंपरीचेकदरुर येथे पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंचपदी अमोल भोयर यांची बिनविरोध निवड

चेकदरुर येथे पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंचपदी अमोल भोयर यांची बिनविरोध निवड

गोंडपिपरी:  तालूक्यातील चेकदरूर ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी अडीच वर्षोनतंर यांची बिन विरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच निवडी साठी चेकदरुर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि. ५ आक्टोबर रोजी विशेष सभा घेण्यात आली.सरपंच पदासाठी श्री.अमोल भोयर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता.निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी श्री.मगर सर पं.स.गोंडपिपरी यांनी अमोल भोयर यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.प्रमुख उपस्थिती कृषी विभाग अधिकारी श्री. मंगर सर पं.सं गोंडपिपरी,तलाठी श्री. पगाडे सर,पो.पा.अनिल वासलवार,ग्रामसेवक चौधरी सरव तसेच नवनियुक्त सरपंच अमोल भोयर,उपसरपंच सुनिता कोटगले,रविंद्र पाल ग्रा. पं सदस्य,गणपत नागापुरे ग्रां पं.सदस्य,गौतम धुरके ग्रा पं सदस्य,स्नेहा भोयर ग्रा पं सदस्य,संगीता झाडे ग्रा पं सदस्या,अर्चना चौधरी ग्रा पं सदस्य,प्रज्ञा देठे ग्रा पं सदस्य,व तसेच ग्राम पंचायतिचे सर्व शिपाई व गावकरी मंडळी या वेळी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!