Homeगोंडपीपरीमुक्तीसंग्राम दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा... बेटी बचाव बेटी...

मुक्तीसंग्राम दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा… बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबरला जन्मलेल्या सर्व मुलींना बेबी किटची भेट… माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा स्तुत्य उपक्रम..

गोंडपिपरी:- समाज सेवेत कार्यरत असताना मनस्वी आनंद मिळतो, जनसेवा हिच ईश्वर सेवा या म्हणीचा अक्षरशा प्रत्यय येत आहे तो माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्याकडे आपण बघीतल्यावर. निमित्त होते ते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्म दिवसाचे व राजुरा मुक्तिसंग्राम दिनाचे. माजी आमदार श्री.निमकर यांनी *बेटी बचावो बेटी पढाओ* या संकल्पनेला मनाशी घेत स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले. या अनुषंगाने दि.१७ सप्टेंबर देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व २ ऑक्टोबर ” गांधी जयंती ” महात्मा गांधी यांच्या जन्मदिना पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राजुरा विधान सभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या चार तालुक्यात १७ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या सर्व मुलींना बेबी किट ची भेट देण्याचे ठरविले व सेवा सप्ताहाचा स्वतः शुभारंभ केला. त्या अनुषंगाने गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत प्रा.आ.उपकेंद्र नंदवर्धन येथे जन्मलेल्या अडेगाव येथील सौ.सुषमा दिलिप नागापुरे यांच्या कंन्येला नंदवर्धन या गावी आजोबा लहुजी कूडे यांचे घरी जाऊन रविवार (१७ सप्टेंबर) चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते बेबी किट भेट दिली व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. अशा अनोख्या पद्धतीने मा.पंतप्रधानाचा वाढदिवस व मुक्तिसंग्राम दिवस साजरा केल्याबद्दल या उपक्रमाचे अभिनंदन केल्या जात आहे. याप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर, नवजात बाळाचे वडील दिलिप नागापुरे, आई सुषमा, आजोबा लहुजी कुडे, गोंडपिपरी तालुका भाजप अध्यक्ष बबन निकोडे, भाजप नेते अमर बोडलावार, कृऊबा समिती सभापती इंद्रपाल धुडसे, उपासभापती स्वप्नील अनमुलवार, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष साईनाथ मास्टे, गोंडपिपरी न. पं. चे माजी अध्यक्ष संजय झाडे , बाजार समितीचे संचालक सर्वश्री गणपती चौधरी, संदीप पौरकार, प.स.चे माजी उपसभापती अरूण मडावी, प.स.माजी सदस्य संजय वडस्कर, तळोधी चे उपसरपंच मारोती अम्मावार, धाबा चे उपसरपंच हिराचंद कंदिकुरवार, विठ्ठल चनकापुरे सह ग्रामस्थ उपस्थित होते. या दिवशी जन्मलेल्या सर्व नवजात बलिकांची माहिती सर्व ग्रामीण रुग्णालय व प्रा. आ. केंद्राच्या माध्यमातून घेतली जात आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!