Homeचंद्रपूरकोरपनाप्रेरणा महाविद्यालयात विद्यापीठ स्थापना दिवस उत्साहात साजरा

प्रेरणा महाविद्यालयात विद्यापीठ स्थापना दिवस उत्साहात साजरा

गडचांदूर- युग चेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदुर येथे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापना दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी डॉ. राजकुमार मुसने यांच्या शुभहस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

राज्यभर विस्तार असलेले विद्यापीठ व विद्यापीठ स्थापना दिवसाचे महत्त्व त्यांनी सांगितले .सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर धोटे सर यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडले . यावेळी संस्थेच्या प्रा . धनश्री चिताडे, प्रा.एजाज शेख प्रा. राहुल ठोंबरे,प्रा. मनीषा मरसकोल्हे प्रा.सचिन पवार,प्रा रोशनी खाते, प्रा.सचिन धनवलकर ,प्रा. श्रीकांत घोरपडे व प्रतीक मून,गजानन भारती व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राहुल ठोंबरे यांनी तर संचालन माधुरी बावणे व आभार विद्या दुर्गे यांनी केले

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!