विकासकामांच्या माध्यमातून ब्रम्हपूरी मतदारसंघाचा कायापालट करणार- विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार ब्रम्हपूरी येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या भुमीपुजन प्रसंगी प्रतिपादन

575

ब्रम्हपूरी: मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रगतीपथावर असून येत्या काळात देखील ही विकासकामांची गंगा कायम वाहत राहणार असुन देशभरातील नागरिक ब्रम्हपुरी बघायला येतील त्यासाठी विकासकामांच्या माध्यमातून ब्रम्हपुरी मतदारसंघाचा कायापालट करणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधीपक्षनेता, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपूरी-आरमोरी रस्त्यावरील रेल्वे क्राॅसिंगवरील उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या भुमीपुजनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

याप्रसंगी मंचावर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्राचार्य देविदास जगनाडे, काॅंग्रेसच्या ओबीसी सेलचे राष्ट्रीय समंवयक अॅड गोविंदराव भेंडारकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अशोक रामटेके, माजी जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी पं.स. सभापती नेताजी मेश्राम, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, न.प.आरोग्य सभापती अॅड. बाला शुक्ला, नगरसेवक डॉ नितीन उराडे, नगरसेवक प्रितीश बुरले, न.प.माजी उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, नगरसेविका लताताई ठाकुर, महीला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सुचित्रा ठाकरे, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे, माजी जि.प.सदस्य खोजराज मरस्कोल्हे यांची यावेळी उपस्थिती होती.

पुढे बोलतांना विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार म्हणाले की, रेल्वे क्राॅसिंगवरील उड्डाणपुलाच्या भुमीपुजनावरून विरोधक राजकारण करु पाहत आहेत. मात्र सदर रेल्वे क्राॅसिंगवरील उड्डाणपुलासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी कॅबिनेट मंत्री असतांना राज्याच्या विशेष अर्थसंकल्पातुन 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर प्रशासकीय मान्यतेच्या कारणास्तव सदर काम रखडले होते. सोबतच ब्रम्हपुरी शहरातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या काळात गांगलवाडी ते व्याहाड हा रस्ता देखील मंजूर होणार आहे. देशात परिवर्तनाची लाट पसरली असुन देशात काॅंग्रेस प्रणित इंडिया आघाडीचे सरकार बनेल. राज्यातील सध्याचे ट्रिपल इंजिन सरकार राज्याला उध्दवस्त करत आहे. या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या, दंगली, दलितांवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महीला व युवती असुरक्षित आहेत. या सरकारचे हे अपयश आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.