कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका… नागभिड पोलिसांची कारवाई….

308

नागभीड: आज दिनांक 26/08/ 2023 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राम मंदिर चौक याठिकाणी पाठलाग करून अवैधरित्या जनावरे वाहतूक करणारे पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH 40 N 5792 अंदाजे किंमत 12,00,000/- थांबवून तपासणी केली असता 18 नग बैल क्रूरपणे पाय बांधून कत्तलीसाठी कोंबून नेत असल्याचे दिसून आले.

आरोपी नामे – 1)मोहम्मद राजिक मोहम्मद साबीर वय 44 वर्ष जात-मुसलमान धंदा – जनावरे खरेदी विक्री रा. नालसहाबपुरा, जुनी वस्ती, मूर्तिजापूर जील्हा – अकोला
2) संजय गंगाराम नांदुरकर वय 30 वर्ष धंदा मजुरी , जात – डोहर रा. वार्ड न. 9 , जुनी वस्ती तेलीपुरा , मूर्तिजापूर जिल्हा – अकोला
यांना ताब्यात घेण्यात आले असून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH 40 N 5792 अंदाजे किंमत 12,00,000/- व 18 नग बैल अंदाजे किंमत 1,80,000/- असा एकूण 13,80,000 किंमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कार्यवाही ठाणेदार योगेश घारे यांचे सोबत पोलीस उपनिरीक्षक संजय पोंदे, पोलीस हवालदार सतीश उपाध्ये, पोलीस शिपाई अजित शेंडे, रोहित तुमसरे, गजानन मडावी यांनी केलेली आहे…!!!