Homeचंद्रपूरराजुरावाचनालयास दिली स्पर्धा परीक्षांची पुस्तके वसंत वरारकर यांचा पुढाकार, जगतगुरु वाचनालयात...

वाचनालयास दिली स्पर्धा परीक्षांची पुस्तके वसंत वरारकर यांचा पुढाकार, जगतगुरु वाचनालयात कार्यक्रम..

वरुर रोड: सध्याचे युग स्पर्धा परीक्षेचे आहे. शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र, गावखेड्यात पाहिजे तशा सुविधा नाही. स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही नाही. हाच उद्देश समोर ठेवून

वरुर रोड येथील सोलार कंपनीचे व्यवस्थापक वसंत वरारकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयास सात हजार रुपयांची स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट दिली.
राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथे गेल्या पाच वर्षांपासून वाचनालयातील विद्यार्थी सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमात सहभाग होत असतात. वाचनालयाच्या माध्यमातून थोर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थांना एक स्वतंत्र विचारमंच उपलब्ध करुन देत असतात.यात स्वच्छ्ता जनजागृती, एड्स जनजागृती, वृक्ष रक्षाबंधन, साक्षरता अभियान, पथनाट्य, युवा मित्राच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, रॅली, कोरोना काळातही शासनाचे नियम पाळून विद्यार्थ्यांना शिक्षणदानाचे कार्य, सामाजिक उपक्रम यांचा समावेश आहे. याच कार्याबद्दल वाचनालयातील विद्यार्थ्यांचा अनेक सामाजिक ,राजकीय संस्थांनी सन्मानदेखील केला आहे.सामाजिक कार्यकर्ते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुस्तके,शैक्षणिक साहित्य, महापुरुषांची प्रतिमा भेट देत असतात.सामाजिक बांधलकी जोपासत वरूर रोड येथील सोलार कंपनीचे व्यवस्थापक वसंत वरारकर यांनी वाटनालयाला सात हजार रुपयांची पुस्तके भेट दिली आहे. याबद्दल वाचनालयातील विशाल शेंडे, स्वप्नील जीवतोडे, सागर बोरकर, प्रज्ज्वल बोरकर, प्रवीण चौधरी, मयूर जानवे, साहिल मडावी, वनिता लाटेलवार, मेघा करमनकर, श्रुती बोरकर, समीक्षा जीवतोडे, समीक्षा मोडक, पल्लवी काळे यांनी वसंत वरारकर यांचे आभार मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!