नागपूर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत मा.श्री सुमंत भांगे( सचिव,सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र),मा.श्री सुनीलजी वारे(महासंचालक, बार्टी, पुणे),मा.श्रीमती इंदिरा अस्वार(निबंधक, बार्टी, पुणे), मा.श्रीमती स्नेहल भोसले (विभागप्रमुख बार्टी) व मा.श्री रितेश गोंडाने (कार्यालयीन अधीक्षक बार्टी पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरात JEE व NEET प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.
बार्टी मार्फत JEE व NEET चे प्रशिक्षण एकूण 200 विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून नागपूर येथील नामांकित संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्याची निवड करण्यात आलेली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत हे प्रशिक्षण नागपूर शहरात दिल्या जाणार आहे.विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी प्रति महिना विद्यावेतन तसेच शैक्षणिक साहित्य बार्टी मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नागपुरात JEE व NEET प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन विविध शिकवणी वर्गात करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे चे कार्यालयीन अधीक्षक श्री रितेश गोंडाने,प्रकल्प अधिकारी श्री तुषार सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी श्री हृदय गोडबोले उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आली.
जिद्द,मेहनत व अभ्यास ही त्रिसूत्री अंमलात आणून विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे.बार्टी ही संस्था नेहमी विद्यार्थी हितासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन श्री रितेश गोंडाने यांनी उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले.कार्यक्रमाच्या प्रसंगी JEE व NEET प्रशिक्षणासाठी निवड झालेले विद्यार्थी,पालक तसेच शिकवणी वर्गातील शिक्षकवृंद उपस्थित होते.







