वरोरा : वर्धा जिल्ह्यातील गंगापूर येथील शेतकऱ्याचा चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा शेतशिवारात करंट लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वामन गोपाळराव सडमाके (६७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी वरोरा तालुक्यातील शेगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील कारवाई सुरू आहे. मृत वामन सडमाके मंगळवारी बैल चारण्यासाठी सुसा शिवारात आले असता त्यांना करंट लागून जागीच मृत्यू झाला. रात्री ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, रात्री कुठेही आढळले नाही. बुधवारी सकाळी एका शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला.







