वरोरा:-तालुक्यातील सर्व गावात जनावरांवर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे तरी तात्काळ पशु वैद्यकीय अधिकारी यांनी लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना सैनिक अभिजित कुडे यांनी केली आहे. विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे व तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. शेतकर्यांचा शेतातील हंगाम सुरू आहे बैल शिवाय शेती शक्य नाही या वेळेस या प्रकाराचे आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या. आधी च या प्रकाराच्या रोगावर निदान म्हणून लसीकरण मोहीम राबवावी. लम्पी रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. या वेळी बैल रोगाने ग्रासले तर शेतकर्याची पंचायत होते त्यामुळे पशु वैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ सूचना देवून तालुक्यात लसीकरण मोहीम राबवावी ही मागणी अभिजित कुडे यांनी केली आहे. निवेदन देवून तात्काळ तालुक्यातील सर्व गावात लसीकरण मोहीम सुरू करावी यावेळी निखिल मांडवकर, रोशन भोयर व शेतकरी उपस्थित होते.







