Homeचंद्रपूरदेहविक्री प्रकरणात १४ आरोपींना १४ दिवसांची कोठडी वरोरा येथील घटना....

देहविक्री प्रकरणात १४ आरोपींना १४ दिवसांची कोठडी वरोरा येथील घटना….

वरोरा: येथील पोलिसांनी शुक्रवारी 4 ऑगस्टला उघडकीस आणलेल्या सेक्स रॅकेटच्या संदर्भात बुधवारी 13 आरोपींना वरोरा न्यायालयात हजर केले आहे.यात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

4 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी शहरात संशयास्पदरित्या फिरताना आढळली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली.तेव्हा तिला एका व्यक्तीने ग्राहकाला भेटण्याकरिता पाठविल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी लगेच सूत्रे हलवली आणि तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या 22 वर्षीय महिला व एक पुरुष एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांनी ग्राहकांची नावे सांगितली. यावरून पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली तर यातील एक आरोपी जेलमध्ये होता. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बलात्कार, सामूहिक अत्याचार , बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि पिटा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.या गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.
या संदर्भात अटकेत असलेल्या आरोपीच्या नातेवाईकानी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पोलिसांनी केवळ फोन कॉल, आणि ऑनलाईन पैसे पाठविल्याच्या कारणावरून अटक केल्याचा आरोप केला. तसेच आरोपीसोबत पोलीस संपर्क करू देत नाही असेही ते म्हणाले.यावर स्पष्टीकरण देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, यातील काही आरोपींनवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीनी अल्पवायिन मुलीला चाकूचा धाक दाखवीत अत्याचार केला. आरोपीचे विविध स्थळाचे व्हिडिओ फुटेज पोलिसांकडे असल्याचे पोलीस अधिकारी म्हणाले.या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी करीत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!