Homeचंद्रपूरसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्यांचा जल्लोष शाम म्हशाखेत्री जिल्हा संपादक चंद्रपूर 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्यांचा जल्लोष शाम म्हशाखेत्री जिल्हा संपादक चंद्रपूर 

चंद्रपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वत्र एकच जल्लोष केला. चंद्रपूर येथील महानगरपालिकासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्यमेव जयतेचा नारा देत आनंदोत्सव साजरा केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक नंदू भाऊ नागरकर,चंद्रपुर युवक काँग्रेस शहर जिला अध्यक्ष राजेश अडूर, माजी अध्यक्ष चंद्रपुर कांग्रेस कमेटी, सुभाष भाऊ गौर,माजी नगरसेवक संतोष भाऊ लहमगे, सेवादल अध्यक्ष सूर्यकांत भाऊ खनके, गोपाल भाऊ अमृतकर, माजी नगरसेविका, सुनीता लोडिया, माजी नगरसेवक, अमजत ईरानी, प्रवीण पडवेकर, युवक कांग्रेस रमीज भाई शेक , प्रवीण भाऊ लांडगे, शालिनी भगत, राजू दास, विनोद संकत, प्रवीण कुमार वडलुरी, प्रकाश देशब्रतर, आतिफ रजा,इतर पदाधिकारी उपस्थित होते व शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करून आणि ढोल वाजवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या एका टिकेवरून राहुल गांधी यांच्याविरोधात गुजरातच्या सुरत कोर्टात हेतुपुरस्सर याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरून स्थानिक न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवित त्यांना शिक्षा सुनावली होती. हीच संधी साधून भाजपाने राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द केले होते. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने खासदारकी रद्दला स्थगिती दिली असून, पुन्हा ते नव्या जोमाने संसदेत विरोधकांचा आवाज बुलंद करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वत्र जल्लोष करीत या निर्णयाचे स्वागत केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!