महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची निवड…

431

मुंबई – अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद खाली झाले होते, आज नव्या विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदार संघाचे आमदार विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्षनेते पदी विराजमान झाले आहे.विरोधी पक्ष नेता पदी अनेकांची नावे चर्चेत होती मात्र त्यामध्ये विजय वडेट्टीवार यांनी बाजी मारली आहे.

याआधी सुद्धा वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते पदावर होते, या पदावर विराजमान होण्यासाठी नाना पटोले, अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत होती, मात्र पक्षाने वडेट्टीवार यांच्यावर विश्वास टाकला.