गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव वासीयांना पावसाळ्यात अतिवृष्टीत इतर गावाशी संपर्क साधता येत नाही. गावात पूरेशी सूविधा उपलब्ध नाही. अश्यातच गावकऱ्यांना अनेक संकटाशी झुंज द्यावी लागते.पावसाळ्यातील मार्ग सुरळीत व्हावं म्हणून गावकऱ्यांचा मागणीनुसार माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी मागील वर्षी 2022 मध्ये मा. नामदार सूधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बैठक, नियोजन भवन चंद्रपूर येथे पार पडलेल्या बैठकीत तोहगावच्या या समस्येकडे भाऊंच लक्ष वेधले,याची दखल घेऊन मा नामदार.सूधीरभाऊंनी बांधकाम यंत्रणेला सूचना दिली.व जूलै 2023 च्या बजटमध्ये शासनाकडून 10 कोटी रू मंजूर करून दिले.
**दिला शब्द केला पूर्ण ** या ची प्रचिती वारंवार प्रत्ययास येते. तोहगाव क्षेत्रातील जनतेच आनंद प्रफुल्लित होऊन विकासाचे महामेरू मा नामदार.सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचे खूप खूप आभार मानले आहेत.