Home चंद्रपूर अडेगांव परिसरातील पूरपरिस्थितीने शेतकऱ्यांचे हाल… -शरद कुकुडकार गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी

अडेगांव परिसरातील पूरपरिस्थितीने शेतकऱ्यांचे हाल… -शरद कुकुडकार गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी

652

गोंडपिपरी – अनेकांच्या शेतात पुराचे पाणी आलेल्या अडेगांव परिसरातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे पुन्हा पिक पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

विदर्भसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने वर्धा नदीला पूर आला आहे. त्याच्या डाबी निघून नाल्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतात पसरत असल्याने पिके पुराच्या मृग नक्षत्राने दगा दिल्याने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना २३ ते ३० जून दरम्यान पेरणी आटोपल्या होता. पिकांची उगवून चांगली होऊन पिके जोमाने वाढण्यास सुरुवात झाली असतांना संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी
पाणी सुरू झाली. याचा फटका अडेगाव परिसरात पण पडला. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिके सडण्यास सुरुवात झाली असतानाच आता वर्धा नदीला पूर आल्याने त्याचे संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पसरतांना दिसत आहे.

वर्धा नदीला पैनगंगा, इराई, झटपट नदीचा प्रवाह येतो. तसेच वर्धा, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या अतिमुसळधार पावसाने पैनगंगा व यवतमाळ जिल्ह्यात पूरपरिस्थिती आहे. हे सर्व पुराचे पाणी वर्धा नदीला येत असल्याने वर्धा नदीला जास्त धोका निर्माण होऊन मोठा पूर होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

गत वर्षी महाराष्ट्रसह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने वर्धा नदीला चार वेळा पूर आल्याने अडेगांव परिसरात 50 टक्के शेतकऱ्यांचे पिके नष्ट झाली होती. शासनाकडून शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी मदत न मिळाल्याने व विमा कंपनीने तुटपुंजी मदत देऊन एक प्रकारची थट्टा केली होती.
शेतकऱ्यांचे खरीप पिके गेली तरी कसे बसे रब्बी पिके शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण अवकाळी पाण्याने रब्बी पिकांचे नुकसान केले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली होती. कुणाला घर बांधायचे, तर कुणाला मुलांना उच्च शिक्षण द्यायचे स्वप्न शेतकऱ्यांचे होते पण नापिकीने ते स्वप्नच राहून गेले. रब्बी पिके पीक कर्ज भरून नवीन कर्जाची उचल करून शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली होती. पण पुन्हा वर्धा नदीला आलेला पूर शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरणार आहे.

Don`t copy text!