Home चंद्रपूर संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा कहर असतांना पालकमंत्री उद्घाटनात व्यस्त:- विनोद अहिरकर ...

संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा कहर असतांना पालकमंत्री उद्घाटनात व्यस्त:- विनोद अहिरकर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानी नैसर्गिक आपत्तीकडे लक्ष देण्याची मागणी

659

चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालेला आहे. अवघे चंद्रपूर शहर एका पावसातच जलमय झालेले असून महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नैसर्गिक आपत्तीकडे पूर्णतः लक्ष देण्याऐवजी उद्घाटनामध्ये व्यस्त आहेत असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर असून शेतकऱ्यांच्या पिकांची पावसामुळे नुकसान झालेली आहे. नद्या नाले ओसंडून वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झालेली आहेत. तसेच चंद्रपूर शहरही महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे जलमय झालेले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याबाबत कठोर उपाय योजना करणे गरजेचे असून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची गरज आहे. परंतु अशातच पालकमंत्री आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यस्त असून जिल्ह्याच्या जनतेकडे दुर्लक्ष करीत आहेत. ही बाब गंभीर असून पालकमंत्र्यांनी योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना व जनतेला दिल्याचा देण्याची गरज आहे. संपूर्ण प्रशासनाला उद्घाटनाच्या कामात लावून आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. आज मुल तालुक्यात विविध ठिकाणाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ् आहे. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती असताना उद्घाटनाच्या तारखा पुढे ढकलल्या असत्या तर काय फरक पडला असता? असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी केला आहे.

Don`t copy text!