चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे, अशातच घोसरी येथील पंचशील नगर दलित वस्ती येथील अंगणवाडी केंद्र संपूर्ण जलमय झाले आहे,
सविस्तर वृत्त याप्रमाणे की खेडी – गोंडपिपरी मार्गालगत असलेल्या घोसरी येथील मुख्य रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलियाच्या कामाचे मातीचे ढिगारे ठेवल्यामुळे त्या ढिकाऱ्यांचा दाब मारून पावसाचे पाणी अंगणवाडी व वनविभाग कार्यालयात शिरले आहे, त्या पाण्याला जाण्यासाठी कुठलाही मुख्य रस्ता प्रवाह नाही, संबंधित कार्यालयाशी संपर्क केला असता, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, वनमंत्री, आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार जी, यांचा दौरा खेडी गोंडपिपरी मार्गालगत असल्यामुळे सदर मार्गाचे खड्डे बुजविण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे आम्ही येऊ शकत नाही, तुमच्या गावातील समस्येचा निराकरण करू शकत नाही, उद्याला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून सदर अंगणवाडीतील व वन विभाग कार्यालयातील साचलेल्या पाण्याचा मार्ग काढू अशी विनंती केली, आदरणीय पालकमंत्री साहेब, वन मंत्री साहेब, लहान मुलं ही देवाघरची फुलं ही संकल्पना आपण प्रत्यक्षात उतरवून या लहान बालकांना उद्या तरी आपल्या अंगणवाडीत जायला मिळेल का?
प्रशांत झाडे
तालुका प्रतिनिधी इंडिया दस्तक न्यूज






