गोंडपीपरी: तालुक्यातील वढोली गावात मागील एक वर्षा पासून अवैध दारू विक्री पूर्ण पाने बंद झालेली आहे अशातच छुप्या मार्गाने खुशाब तेलसे नामक आरोपीने अवैध दारू विक्री सुरू ठेवली ह्याची खबर तंटामुक्त समिती वढोली ला लागताच आज मंगळवार दि.11/07/2023 रोजी समितीचे अध्यक्ष संदीप लाटकर,उपाध्यक्ष अनुप कोहपरे, सदस्य निखील नामेवार,दशरथ कोहपरे यांनी धाड टाकून 42 देशी दारूचे टिल्लू पकडण्यात आले समितीने लगेच राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरला महिती दिली…माहिती मिळताच दुय्यम निरीक्षक मोनाली कुरडकर आणि त्यांच्या टीमने काही वेळातच मोक्यावर येऊन आरोपी खुशाब तेलसे यांना ताब्यात घेऊन कारवाई केले पुढील तपास दुय्यम निरीक्षक मोनाली कुरडकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे..यापुढे वढोलीतील अवैध दारू विक्रेते दारू विक्री करणार नाही अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम तंटामुक्त समिती वढोलीने दिला आहे.