Homeचंद्रपूरपोंभुर्णाघोसरी येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य मेळावा  प्रशांत झाडे, पोंभुर्णा ताललुका प्रतिनिधी

घोसरी येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य मेळावा  प्रशांत झाडे, पोंभुर्णा ताललुका प्रतिनिधी

पोंभूर्णा: दिनांक 12 जुलै 2023 रोजी आरोग्य उपकेंद्र घोसरी येथे आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, आरोग्य मेळाव्याला उपस्थित घोसरी गावच्या सरपंच सौ. रोषणा लोळे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आरोग्य मेळावा घेण्यात आला, सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली घोसरी उपकेंद्राच्या सी एच ओ कुमारी प्रियंका इप्पलवार यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन केले, आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे, आरोग्याची काळजी घेतली तर आपला बराच पैसाची बचत होतो, तसेच आरोग्य सुदृढ व चांगले राहण्यासाठी काय काय उपाययोजना करायला पाहिजे पाहिजे आपले खानपान रहन सहन समज गैरसमज प्लास्टिकचा वापर कमी करणे इत्यादीवर मार्गदर्शन करण्यात आले तसेच स्तनदा माता, गरोदर माता, किशोरी, यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला, आपल्या गावातील स्वच्छता, गटारे डबके रस्ते व आपल्या घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे असे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले

या आरोग्य मेळावाला उपस्थित गावातील नागरिक शालेय विद्यार्थी यांची उपस्थिती होती, आरोग्य कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशा वर्कर, उज्वला दुर्गे, पौर्णिमा चुदरी,सहकार्य केले

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!