Home गोंडपीपरी वाहून गेलेल्या मुलांचे मृतदेह सापडले : खेकळे पकडणे बितले जीवावर :मृतदेह बघताच...

वाहून गेलेल्या मुलांचे मृतदेह सापडले : खेकळे पकडणे बितले जीवावर :मृतदेह बघताच कुटुंबियांनी फोडला हंबरडा

1653

वाहून गेलेल्या मुलांचे मृतदेह सापडले : खेकळे पकडणे बितले जीवावर :मृतदेह बघताच कुटुंबियांनी फोडला हंबरडा

गोंडपिपरी:वर्धा नदीच्या पात्रात खेकडे पकडायला गेलेल्या कोवळ्या मुलावर काळ कोपला. प्रवाहात गेल्याने तीन मुले वाहून गेलीत.ही दुदैवी घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगावात शनिवारला घडली.मुलांना शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली.आज शोध मोहिमेला यश आले.वाहून गेलेल्या तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले आहेत. आज ( रविवार ) पहाटेला नेताजी जुनघरे या मुलाचा मृतदेह सापडला.त्यानंतर
निर्दोष ईश्वर रंगारी,सोनल सुरेश रायपुरे यांचे मृतदेह सापडले.मुलांचे मृतदेह बघून कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. या दुदैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या तोहोगाव येथील
प्रतिक नेताजी जुनघरे,निर्दोष ईश्वर रंगारी,सोनल सुरेश रायपुरे, आरुष प्रकाश चांदेकर ही चार मुले वर्धा नदीच्या काठावर खेकळे पकडायला गेलीत. त्यापैकी आरुष प्रकाश चांदेकर हा नदी काठावर उभा होता. खेकडे पकडत असताना तिघे नदीच्या प्रवाहात गेले.आणि तिघे वाहून गेलेत. या घटनेने हादरलेला आरूष धावतच गावाकडे गेला. घडलेली घटना त्याने गावात सांगितली. गावाकर्यांनी लगेच नदी पात्राकडे धाव घेतली. नदी पात्राजवळ मुलांचे कपडे दिसून आलेत. त्यामुळे मूलं वाहून गेली असावी अशी शंका वाढली. मुलांचा आई वडीलानी एकच टाहो फोडला.घटनेची माहिती कोठारी पोलीस स्टेशनला देण्यात आली. कोठारी,लाठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोध मोहीम सुरु केली.आज ( रविवार ) पहाटेला प्रतीक जुनघरे याचा मृतदेह घटनास्थळापासून दीड की.मी.अंतरावर सापडला.तर निर्दोष रंगारी, सोनल रायपूरे या मुलांचे मृतदेह आर्वी पुलाजवळ सापडले आहेत.राजुरा विधानसभा क्षेत्राचे सुभाष धोटे,चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मृतकांचा कुटुंबियांची भेट घेतली.कुटुंबियांचे सात्वन केले.

Don`t copy text!