Homeचंद्रपूरहोमगार्ड संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास निवेदन

होमगार्ड संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास निवेदन

चंद्रपूर: महाराष्ट्र होमगार्ड असोसिएशनच्या माध्यमातुन चंद्रपूर जिल्हयातील होमगार्ड जवानांनी चंद्रपूर जिल्हाअधिकारी सा. यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सा. व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणवीस सा. यांना खालील दिलेल्या मागण्यानिमित्त निवेदन देण्यात आले. बॉम्बे होमगार्ड अॅक्ट 1947 अंतर्गत ” निष्काम सेवेचा नावाखाली महाराष्ट्र राज्य शासनाकडून होणारी पिळवणूक थांबवून होमगार्डस जवानांना ३६५ दिवस नियमित रोजगार देण्यात यावा यासाठी खालील सही करणारे जिल्हा चंद्रपूर होमगार्ड सैनिक…

गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्डसृ संघटना ही भारतातील एक सैनिक स्वयंसेवी संघटना भारतीय पोलिस दलाला सहकारी असे हे गृहरक्षक दल आहे. १९४६ मध्ये मुंबईत जातीय दंग्यांनी थैमान घातले होते, त्यांचे शमन करण्याच्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापण्यात आली आहे. तरी या संघटनेतील चंद्रपूर जिल्हयातील खालीलप्रमाणे मागण्या पुर्ण करण्याकरिता आज दि.०५ जुलै २०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब यांना होमगार्डचे शिष्टमंडळ जावून निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र होमगार्ड सैनिकांचे संविधानिक न्यायिक मागण्या :-

1) भारतीय संविधान कलम 13 नुसार बॉम्बे होमगार्ड अॅक्ट 1947 मध्ये विशेष सुधारणा अथवा बदल करण्यात यावे तसेच यातील निष्काम सेवा हे (मानसेवी व स्वयंसेवी परिभाषेतील संभ्रम निर्माण करणारे) ब्रीदवाक्य नष्ट करून नियमित सेवा किंवा इतर अर्ध सैनिक बला प्रमाणे आदर्श ब्रीदवाक्य देण्यात यावे.
2) बॉम्बे होमगार्ड अॅक्ट 1947 मधील दर 3 वर्षांनी होणाऱ्या पुनर्न नोंदणी पुनर नियुक्ती प्रणाली अथवा पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी.3)बॉम्बे होमगार्ड अॅक्ट 1947 चे बॉम्बे पोलीस अॅक्ट…. प्रमाणे किंवा 118 बटालियन चा धरतीवर सुधार करण्यात यावे.
(4) भारत सरकार आदेश :- (अ) संख्या-01/11/66 दिनांक 17.12.1966 आणि 20.12.1967. (ब) आदेश संख्या -1 /4/67 CDDT. 19.02.1968

(5) केंद्र सरकारच्या उपसचिवांनी काढलेल्या दि. 17 जानेवारी 1984 चा आदेश चे अमलबजावणी करून होमगार्डना 365 दिवस नियमित करण्यात यावे.
6) भारतीय संविधान कलम 14 कायद्यापुढे समानता, कलम 16 (1) व 16(4) नुसार बॉम्बे होमगार्ड
१९४७ मधील माणसेवी कर्मचारी पद आणि वैतनिय कर्मचारी पद असा भेदभवाचे नष्ट करूनी महाराष्ट्र
होमगार्ड विभागात होमगार्ड सैनिकांना प्रतिनिधित्वाची समान संधी देण्यात यावी.
7) पोलीस विभाग प्रमाणेच राज्य ने दर आर्थिक वर्षी त्यांचा बजट सत्रात होमगार्ड विभाग करिता स्वतंत्र बजट चे व्यवस्था निर्माण करावे तसेच प्रतिवर्ष महागाई दर अनुरूप होमगार्ड विभागाला महागाई भत्ता उपलब्ध करण्याचे विधान तयार करण्यात यावे.
8) परेड चा भत्ता कर्तव्य भत्ता चा दर समप्रमाणानुसार देयक असावा,
9) इतर राज्यां प्रमाणे महाराष्ट्र राज्य मध्ये देखील ३ वर्षे सेवा देवू केलेले होमगार्ड सैनिकांना पोलीस विभाग, वन विभाग यात 50% आरक्षण आधारे सरळ भरती वा नेमणूक देण्यात यावी.
10) बॉम्बे होमगार्ड अधिनियम 1947 कलम 9 नुसार होमगार्ड हा लोक सेवक समजण्यात येतो तसेच त्याला शासकीय प्रशासकीय लोकसेवक प्रमाणे ESIC, EPF EL CLई. सेवा सुविधा देण्यात यावे.
11) होमगार्ड सैनिकांच्या तसेच होमगार्ड विभागाचा दर्जा व वर्ग ठरविण्यात यावे.
12 ) होमगार्ड संघटना ही केंद्र सरकार अथवा राज्य सरकार कोणीही एका चा नियंत्रणात असावी. 13) बॉम्बे पोलीस अॅक्ट नुसार होम गार्ड पाल्यांना अनुकंपा तत्वा प्रणालीने सेवा भरती मिळावी.
14) होमगार्ड सैनिकांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा किमान 60 वर्षे पर्यत करण्यात यावी.वरील मागणीसाठी चंद्रपूर जिल्हयातील होमगार्ड जवान तुळशिराम जांभुळकर, रमेश गंडेट्टी, संतोष कामटवार, दिनेश टेभुरकर, आशिष नगापूरे, करन उपरे, चंदु उपरे, आकाश नवघडे, संदिप उमरे, महेश कोवे, पोर्णिक झाडे, प्रेमकुमार कोयते, नंदकुमार दोडके, राकेश कामडी, प्रणि नेव्हारे, सुनिता मेश्राम, गिरीश जोगी, महेश कुलसंगे, विनोद गुणशेट्टीवा, छाया नैताम, नितेश कातकर, भुमिका मडावी, सचिन भटारकर, विनतीत मांडवकर, संकते चिंचेकर, कवडू चिंवडे, आशिष क्षिरसागर, गोपाल उपरे, शंकर दुपारे, नागेश देशमुख, अश्विनी दुर्गे, संतोषी वालदे, भास्कर लेडांगे, स्वामी आगदरी, शारदा खोब्रागडे, गिता बनकर, रजनी जिवने, श्याम वाढई, जमिर शेख ई. जवान मोठया संख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!